
Ladki Bahin Yojana New Update – जून-जुलै हप्ता एकत्र?
लाडकी बहीण योजनेच्या जून-जुलै 2025 च्या हप्त्याबाबत नवीन अपडेट! पात्र महिलांच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Ladki Bahin Yojana New Update – जून-जुलै हप्ता एकत्र?
27 जून 2025 | GreenMarathi.com लाडकी बहीण योजनेतून लाभ घेत असणाऱ्या लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अनेक जणी विचारत होत्या की, जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आता मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने १२ वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.Ladki Bahin Yojana New Update जून-जुलै हप्ता एकत्र मिळणार?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जून व जुलैचा हप्ता मिळविण्यास विलंब होतो आहे, पण निधी वितरणाच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या दोन महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.Ladki Bahin Yojana New Update निधी वितरण प्रक्रिया कशी होते?
- प्रथम अर्थ विभागाकडून निधी मंजूर होतो.
- नंतर महिला व बालविकास खात्याकडे तो वितरीत केला जातो.
- संयुक्त बँक खात्यातून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
- ही पूर्ण प्रक्रिया 2-3 दिवसांत पूर्ण होते.